Agro-tourism Centre ( कृषी पर्यटन केंद्र )
कृषी पर्यटन केंद्र, शरद सरोवर, मध्यवर्ती संशोधन केंद्र, डा. पं. दे. कृ. वि., अकोला — नागरिकांच्या सेवेत रुजू
मा. श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या आणि तत्कालीन कुलगुरू ह्यांचे मार्गदर्शनाखाली आकारास आलेले कृषी पर्यटन केंद्र नागरीकांकरिता दिनांक ३१-१०-२०१० पासून सुरु करण्यात येत आहे. हे केंद्र प्रत्येक रविवार, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी व सुटीच्या दिवशी फक्त कुटुंबाकरिता सुरु राहणार आहे. तीन दिवस अगोदर त्यांच्या ओळखपत्रासह नोंदणी करणे आवश्यक आहे. शुल्क व अटी संदर्भात मध्यवर्ती संशोधन केंद्र येथे संपर्क करावा. सदर सेवा प्रथम संपर्क साधण्यार्यास प्रथम संधी / प्रवेश या तत्त्वावर चालविण्यात येईल. या पर्यटन केंद्राची सहल नागरिकांनी आयोजित करून संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती, संचालक, मध्यवर्ती संशोधन केंद्र, डा. पं. दे. कृ. वि., अकोला यांनी केली आहे. |
||
सूचना१. कृषी पर्यटन केंद्र फक्त दुसऱ्या, चौथ्या शनिवारी, दर रविवारी व सार्वजनिक सुटीच्या दिवशी खुले राहील. २. कमीत कमी पांच व्यक्तिंच्या कुटुंबाना प्रवेश देण्यात येईल. ३.तीन दिवस पूर्व सुचनेनुसार नोंदणी करण्यात येईल व नोंदणीसाठी छायाचित्र ओळखपत्र ( PAN Card, Election Card, Driving Liscence etc. ) आवश्यक राहील. ४. प्रवेश शुल्क रु. २५/- प्रती व्यक्ती / विद्यार्थ्यांसोबत येणाऱ्या शिक्षक / कर्मचारी ह्यांना लागू. ५. शालेय विद्यार्थ्यांसाठी रु. १०/- प्रती विद्यार्थी ( १०० विद्यार्थी प्रती दिवस . ६. कृषी पर्यटन केंद्र, खुले राहण्याची वेळ सकाळी १० ते दुपारी ५ पर्यंत राहील. ७. दमनी फेरफटका / घोड्स्वारी /म्हय्स सवारी प्रत्येकी रु. १०/- प्रती व्यक्ती. ८. जेवण व चहा शुल्क रु. ५०/- प्रती व्यक्ती. ९. नोंदणीसाठी विकास विभाग, मध्यवर्ती संशोधन केंद्र, डा. पं. दे. कृ. वि., अकोला येअथे संपर्क साधावा. ( दूरध्वनी करा. ०७२४-२२५८११९ वेळ सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ५ ) १०. ह्या परिसर मध्ये धुम्रपान, मद्यपान, तसेच मांसाहार करण्यास सक्त मनाई आहे. ११. आपल्या कुटुंबातील लहान मुलाचं सुरक्षा / देखभाल आपणासच करावी लागेल. १२. सांपापासून सावधान. १३. आपणांपासून ईतर कुटुंबियांना त्रास होणार नाही ह्यांची दक्षता घ्यावी. १४. कृपया परिसराची स्वच्छता राखावी, कचरा पेटीचा उपयोग करावा. १५.परिसरातील शोभिवंत झाडे, फुले आणि ईतर वस्तूंना हात लाऊ नये. १६. कृषी पर्यटन केंद्र परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा अपघात घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही. १७. वरील सर्व सूचनांचे कृपया पालन करावे. |
||
Services to be provided
The above facilities can be made available only on prior |
||
Conditions
For detail information, contact at Central Research Station,
|